shanti

shanti

Tuesday, April 26, 2011

पहाट

पहाट
पहाट झाली गं 
झुंजू मुंजू झाली गं !

शेतकरी जाई शेता
सूर्य प्रकाश किरण  देता

रंगोलित भरे रंग 
सया कामात गं दंग

पाखरे करती चिव चिव गं  
पहाट झाली गं 
झुंजू मुंजू झाली गं !

पावसाचे थेंब आले 
बिंदु  मोती झाले 
शेतकरी खुश झाला 
आनंदाने गं न्हाला

पीके जोमाने आली गं 
पहाट झाली गं 
झुंजू मुंजू झाली गं !

 हिरवा शालू नेसे 
धरती माता सुंदर दिसे 
शेतक-या  लाभे सुख 
विसरून जाई सारे दु:ख 

कष्टाचे त्याच्या चीज झाले गं
पहाट झाली गं 
झुंजू मुंजू झाली गं !





   

No comments:

Post a Comment